घशात फुगा अडकल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : ३ नोव्हेंबर – ऐन दिवाळीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नागपुरात एका सहावर्षीय मुलाच्या घशात फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपुरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. फुगा फुगवत असताना तो फुटला आणि सहा वर्षीय चिमुकल्याच्या घशात अडकला. घशात फुगा अडकल्याने या चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेनेत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन परिसरातील स्वराज विहार कॉलनी येथे ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास 6 वर्षीय चिमुकला आपल्या घराच्या बाहेर फुग्यांसोबत खेळत होता. यावेळी तो फुगा फुगवण्याचा प्रय्तन करत होता. फुगा फुगवता फुगवता अचानक फुटला आणि मग त्याचा एक तुकडा चिमुकल्याच्या घशात अडकला. फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने या चिमुकल्याला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला.
यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ऐन दिवाळीत घडलेल्या या घडनेने सरंवांनाच एक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply