वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

गब्बरांची ढब्बर दिवाळी !

छोटे गेले , मध्यम गेले
आता पाळी मोठ्यांची
कथा असे ही सत्तेवाचुन
तडफडणाऱ्या मास्यांची !

भ्रष्टाचारामधुनी पैसा
पैसा फेकुन घेती सत्ता
सत्तेमधुनी पुन्हा कमविती
ऐसी यांची नीतीमत्ता !

खाऊन खाऊन बनले गब्बर
अतिखाण्याने फुगले ढेबर
चेलेसुद्धा आता त्यांचे
त्यांच्यावाणी बनले निब्बर !

जनता, राज्य नि देशहि यांच्या
स्वार्थापुढती छोटा ठरला !
सारे जावो खड्ड्यामद्ध्ये
स्वार्थपुर्ती सर्वस्व मानला !

निघतील आता ठगसेनांची
बाहेरी ती अंडीपिल्ली !
वाघही आता दिसतिल बनले
म्याव म्याव करणारी बिल्ली !

आता करतील विविध नाटके
सुटेल त्यांचे तोंड फाटके
मुहूर्तावरी दीपावलीच्या
त्या पापांचे फुटले मटके !

       कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply