भरधाव एसटी उलटून तिघे जखमी

गोंदिया : २ नोव्हेंबर – भरधाव एसटी बस उलटून तिघे जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५३ वर गोरेगाव तालुक्यातील ढिमरटोली गावाजवळ घडली.
गोंदियाहून नागपूरला जाणार्या बस क्रमांक एमएच ०७ सी ९१४७ च्या चालकाचे दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव बस अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने प्राण हाणी झाली नसली तरी तिन प्रवासी जखमी झाले. बसमध्ये ३० प्रवासी प्रावास करीत होते. जखमिंना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Leave a Reply