अदानी काय देशापेक्षा, संसदेपेक्षा मोठे आहेत का? – अतुल लोंढे यांचा सवाल

नागपूर : २ नोव्हेंबर – मुंबई क्रुझ पार्टीत देशात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आलं आहे. यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भाजपचा हात आहे. भाजपच्या सत्तेच्या अधिकाराखाली हा ड्रग्जचा वापर मोठ्या प्रमाणात देशात चालला आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतुल लोंढे यांनी केलेल्या या आरोपांमुळं क्रुझ पार्टी प्रकरणाला वेगळं वेळण लागण्याची शक्यता आहे. तसेच मुंद्रा ड्रग्स प्रकरणावर बोलतांना अदानी काय देशापेक्षा, संसदेपेक्षा मोठे आहेत का? असा खडा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसंच, गुजरात येथील मुंद्रा ड्रग्ज प्रकरणावरुनही धक्कादायक खुलासे केले आहेत. अतुल लोंढे यांनी तसे पुरावेही सादर केले आहेत. मुंद्रा बंदरावर २१ सप्टेंबरला तीन हजार किलोचे ड्रग्ज पकडले गेले. मुंद्रावर २१ संप्टेबरला पकडले गेले. तर, मनीष भानुशाली हे गुजरातमध्ये २२ सप्टेंबरला होते. त्यांची आणि गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांची भेटही झाली. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना मुंद्राचा उल्लेख होताच ते किरीट सिंह राणा बोलताना थांबले. तो माईक लगेच काढण्यात आला, असा आरोप लोंढे यांनी केला आहे.
शिवाय, मनिष भानुशाली याने ३ ऑक्टोबरला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो काम हो गया असं बोलताना आढळतोय. या सगळ्या प्रकरणात एक इनोव्हा गाडी आहे. ती गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली. त्याचा पत्ता कराडचा आहे. ही गाडी गुजरातला गेलेली आहे. तिथे सॅम डिसोझा यांच्यात ५० लाखांची देवाण- घेवाण झाली असल्याची आमची माहिती आहे. त्या गाडीत तेच पैसे गेले. तीच गाडी गुजरातला गेली. तीच गाडी एनसीबी ऑफिसला होती. रवींद्र कदम हा या प्रकरणातला मास्टरमाइंट आहे की याचा वापर झाला आहे. ही गाडी तिथे कशी गेली. याचा शोध घेतला पाहिजे. रविंद्र कदमला पकडलं तर हे सगळं समोर येईल, असा खुलासा लोंढे यांनी केला आहे. तसंच, आम्ही त्या गाडीचा शोध घेतला असता ती गाडी ज्याच्या नावावर रजिस्टर आहे. त्या अनुषगांने आम्हाला कराडचा पत्ता मिळाला पण त्या पत्त्यावर रविंद्र कदम राहत नाही, असंही लोंढे यांनी म्हटलं आहे.
किरण गोस्वामी २२ सप्टेंबरला गुजरातमध्ये होते. याचाच अर्थ असा आहे की या देशात मोठ्या प्रमाणा ड्रग्ज आले आणि हे ड्रग्ज लपवण्यासाठी हिंदु- मुस्लीम असा घाट घालून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला गेला. सातत्याने मुंबई ड्रग्ज प्रकरणी बोलण्यात येतं होतं. मुंद्रा प्रकरणातील कारवाई ही जगातली सगळ्यात मोठी कारवाई होती. त्यातून लक्ष वळवण्यासाठी हा घाट घातला, असा आरोपही त्यांनी केला आहे.
डीआरआय हे आयात निर्यातीच्या मालाची चौकशी करत असते, तो अर्थमंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग आहे. या डीआरआय कडून मुंद्रा पोर्टवरील ड्रग प्रकरणाची चौकशी काढून एनआयए कडे वर्ग करण्यात आली. एनआयए हे गृहमंत्रालयाच्या अखत्यारित काम करते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत जे गौतम अदानी हा माझा मित्र आहे असे म्हणतात. यातूनच सर्व स्पष्ट होते. गौतम अदानी यांनी केंद्र सरकार जसे नोटिफिकेशन काढले तसेच नोटिफिकेशन काढत अफगाणिस्तान, इराणमधून येणारे कंटेनर मंद्रा पोर्टवर येणार नाहीत असे म्हणतात, ते कोण आहेत, ते फक्त पोर्टचे हँडलर आहेत. हा अधिकार सरकारचा असतो, कोणा एका व्यापाऱ्याचा नाही. अदानी काय देशापेक्षा, संसदेपेक्षा मोठे आहेत का? असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.
ड्रग्जच्या काळ्या धंद्यात भाजपाचे नेते, भाजपाशी संबंधित लोक यांचे मोठे रॅकेट आहे. देशातील तरुणांना नशेखोर बनवण्याचा गोरखधंदा सुरू असून त्याच्याशी संबंध असलेल्या मनिष भानुशाली, के. पी. गोसावी, रविंद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट काम करत आहे असा खळबळजनक गौप्यस्फोट करत यामागील मास्टर माईंड कोण आहे हे जनतेसमोर यावे यासाठी या सर्वांना अटक करावी आणि इओडब्ल्यू आणि क्राईम ब्रँचमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply