हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकाला केली अटक

नागपूर : १ नोव्हेंबर – नागपूर शहरात हुक्का पार्लरचे पेव फुटले असून, पोलिसांची कारवाई सुरू असली तरी हुक्का पार्लरचे मालक नियम धाब्यावर बसवित असल्याचे दिसत आहे. बजाजनगर हद्दीतील बजाजनगर चौकात असणाऱ्या ओक वडू लॉन्ज नावाच्या हुक्का पार्लरवर झोन १ च्या पोलिस पथकाने धाड टाकली. या कारवाईत मालकाला अटक करण्यात आली आहे.
परिमंडळ क्र. १ चे पोलिस उपायुक्त लोहीत मतानी यांना ओक वडू लॉन्ज येथे काही तरुण-तरुणी प्रतिबंधित हुक्का पीत असल्याची माहिती मिळाली. यावरून मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्रमांक १ च्या पथकातील अंमलदार नायक पोलिस शिपाई रितेश मलगुलवार, फहीम खान, प्रवीण फालके व धर्मेंद्र यादव यांच्या पथकाने या हुक्का पार्लवर धाड टाकली. या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी प्रतिबंधित हुक्का पीत असल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी मालक नवीन प्रभूदास नाथनिअल (वय ३५, रा. ११३, न्यू कॉलनी, सदर, नागपूर) यांना ताब्यात घेतले. त्यांना बजाजनगर पोलिस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Leave a Reply