देवेंद्र फडणवीस राज्यातील ड्रग्स उद्योगाचे मास्टर माईंड – नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप

मुंबई : १ नोव्हेंबर – देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.
निरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतोय असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. गुंडेच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांचं मायाजाल चालायचं असं नवाब मलिक म्हणाले आहेत. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय असं सांगत मलिक यांनी वर्मा नावाच्या व्यक्तीने राणाबद्दलची सर्व माहिती दिल्याचं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं ड्रग्जच्या धंद्याशी काय कनेक्शन होतं याची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी. यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करावे, असं आवाहन फडणवीस यांना केलंय. तसेच फडणवीसांचे या ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहेत, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
भाजपामध्ये अनेक जण ड्रग्ज पेडलर होते, असाही आरोप मलिक यांनी केलाय. मला बोलण्यापासून रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा स्पष्ट आरोप मलिक यांनी केलाय. केला.
फडणवीस मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. त्यामुळे केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करायला लावावा. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी यंत्रणेचा वापर केल्याचंही मलिक म्हणाले. जयदीप राणा सध्या तुरुंगात आहे. याच राणाने देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यासाठी फायनान्स हेड म्हणून काम पाहिल्याचंही नवाब मलिक म्हणालेत.

Leave a Reply