वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

सलाम ! पत्रकारांनो सलाम !

हे भारतातील तमाम महान लुटीयन पत्रकारांनो ,
तुम्हाला माझा लवून सलाम !
ज्या पद्धतीने तुम्ही त्या गंजट्टी आर्यनच्या सुटकेच्या चिल्लरछाप प्रसंगाचा
विश्वस्तरीय ‘इव्हेंट’ केला !
त्याच्या जेलमधुन सुटल्यापासून तर ‘मन्नत’वर पोहचेपर्यंतच्या विजय यात्रेचा( ! )प्रवास कव्हर केला
त्या तुमच्या विलक्षण पद्धतीलाही लवून कडक सलाम !
देशाच्या खऱ्याखुऱ्या हिरोंना झिरो आणि मोठ्ठ्या झिरोला मोठ्ठा हिरो बनवण्याच्या
तुमच्या अद्भुत क्षमतेलाही कडक सलाम !
व्रतस्थ पत्रकारितेला लाळघोट्या , लाचार आणि पोटभरू पत्रकारिकेत
परावर्तित करणाऱ्या तुमच्या जमातीलाही त्रिवार सलाम !
भारतातील लोकशाही ही संविधानावर नसून तुमच्या लेखणीच्या टोकावर उभी आहे !
यावर माझा पूर्ण विश्वास आहे !
तुम्हीच या देशाचं भूत आहे,
देशाचा वर्तमान ‘काळ’ ही तुम्हीच आहे !
तुम्हीच या देशाच्या भविष्याच्या सोनेरी ढगाची काळी किनार आहे !
आणि म्हणूनच माझा तुम्हाला
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा हा कडक सलाम आहे !

         कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply