महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस अँक्शन मोडमध्ये

नागपूर : ३१ ऑक्टोबर – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. देवेंद्र फडणवीस नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जनसंपर्क वाढवला असून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेणं सुरु आहे. फडणवीस यांनी आठवड्यातील दोन दिवस नागपूरमध्ये मुक्काम सुरु केला आहे. भाजपचं मिशन नागपूर मनपा निवडणूक सुरु असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस अँक्शन मोडमध्ये आले आहेत.
नागपूर महानगरपालिका निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे, त्यामुळेच भाजपच्या दिग्गज नेत्यांचा नागपुरात जनसंपर्क वाढवलाय. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील जनसंपर्क वाढवलाय. दर आठवड्याचे दोन दिवस फडणवीस नागपूरात मुक्कामी असतात आणि घरी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.
सकाळपासून नागपूर शहरात फडणवीस यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सकाळी शहरातील सुभाषनगर भागातून फडणवीस यांचा दौरा सुरु झाला. दिवसभर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.नागपूर महानगरपालीकेत १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.
भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि गडकरी – फडणवीसांच्या होमपिचवरील महापालिका असल्यानं भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहेत. त्यामुळेच केलेल्या विकास कामांवर भाजप आगामी निवडणूक लढणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीची तयारी सुरु केलीय. गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिकेत विरोधी पक्षात असणाऱ्या काँग्रेसनं देखील निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रुफल पटेल यांनी देखील नागपूर महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारी लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply