खेलो मास्टर्स गेम्स मध्ये नागपूरच्या जयपाल भोयरने केली सुवर्णपदकाची कमाई

नागपूर : ३१ ऑक्टोबर – खेलो मास्टर्स गेम्स महाराष्ट्र संघटनेच्या वतीने भोसरीच्या इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलात राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स निवड चाचणी अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ३० ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सुरु असलेल्या अँथलेटिक्स स्पर्धेत स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ४० वर्षावरील पुरुष्यांच्या १० हजार मीटर दौडमध्ये नागपूरच्या जयपाल भोयरने सुवर्ण पदकाची कमाई केली.
राष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत १२ किमी. क्रॉस-कंट्री स्पर्धेत एक रौप्य, दोन कास्यपदक तर तेवीस वेळा राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचे व महाराष्ट्र क्रॉस-कंट्री संघाचे प्रतिनिधित्व, भारतीय पोलीस क्रॉस-कंट्री संघात २००७, २००८, २००९ सलग तीन वर्ष जयापालने प्रतिनिधित्व केले. तसेच वरिष्ठ गटात दहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. उद्या ३१ ऑक्टोबर सकाळी ७ वाजता ५००० मिटर दौड स्पर्धेत सुद्धा जयपाल सहभागी होणार आहे. जयपाल भोयर आरपीटीएस पोलीस प्रशिक्षण केंद्रात सहाय्यक फौजदार या पदावर कार्यरत असून ट्रॅक स्टार अॅथलेटिक्स क्लबचा खेळाडू आहे. त्याला पूर्वी शेखर सूर्यवंशी यांचे प्रशिक्षण लाभले तर सध्या रवींद्र टोंग यांच्या मार्गदर्शनाखाली ते सराव करत आहे.
१० हजार मीटर दौड स्पर्धेत जयपालने स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ३५ मिनिटे १८.०१ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदक प्राप्त केले. तर सांगलीच्या अरविंद नलावडेने ३९ मिनिटे ४४.०५ सेकंदात स्पर्धा पूर्ण करीत रौप्य, पुणेच्या विवेक पाटीलने ४२ मिनिटे १६.०८ वेळ देत कांस्यपदक प्राप्त केले. जयपाल भोयरने केलेल्या कामगिरीवर जिल्हा खेलो मास्टर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. शरद सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. सचिव अर्चना कोटटेवार डॉ. संजय चौधरी, रामचंद्र वाणी, प्रा. बंटी प्रसाद यादव, उमेश नायडू आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply