केंद्र सरकारच्या रोजच्या पेट्रोल-डीझेल च्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेची सायकल रॅली

नागपूर : ३१ ऑक्टोबर – पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ युवासेना जिल्हाप्रमुख शुभम नवले व शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र गोडबोले यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सायकल रॅलीच्या जबरदस्त आंदोलनाने कामठी-मौदा विधानसभा दणदणाली. मोदी सरकार हाय हाय, देखो ये मोदी का खेल… १०० रुपया हो गया तेल अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादून गेला होता.
सायकल रॅली देवेन्द्र गोडबोले यांच्या कार्यालयातून बाबरे पेट्रोलपंप मौदा इथं पर्यंत गगनभेदी घोषणाबाजी करत निघाली..
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवेन्द्र गोडबोले,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम नवले,युवतीसेना जिल्हाप्रमुख वैद्य ताई,शिवसेना तालुकाप्रमुख सधुकर हटवार,माजी जिल्हापरिषद सदस्यां भारती ताई गोडबोले,नगरसेविका वैशाली ताई मेहर,नगरसेवक शिवा माथूरकर,युवासेना जिल्हासमनव्यक लखन यादव,युवासेना मौदा तालुका प्रमुख अक्षय पंचबुद्धे,शहरप्रमुख जितू साठवणे,भगवान जुमळे,अमित मते,संजय मेहर,उमेश भोतमांगे,अनिकेत झोड,सचिन तिघरे,माजी सरपंच भोले ताई,भूषण गोडबोले,चेतन गोडबोले,अनिकेत झोड,दर्शन भाऊ,सचिन मेश्राम,आकाश चाकोले,प्यारेलाल तीतीरमारे,गुड्डू भोतमांगे,अंकित मेश्राम,दर्शन डहाके,चैतरम चाचेरे,अभिलाष चौरे,हिमांशू ईखर,दिसु वाढीभस्मे,हुकूमत तिघरे,पंकज भोयर,विश्वास येशकर,दुर्गेश थोटे,बंटी हटवार, व शेकोडे च्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Leave a Reply