भारताला भाडेतत्वावर स्वातंत्र्य मिळाल्याचा दावा करणारी भाजप युवा मोर्चाची प्रवक्ता सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : २९ ऑक्टोबर – भारताला ब्रिटीशांनी ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य दिले आहे, हे अजब वकत्तव्य करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाची प्रवक्ता रुची पाठक सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय.”देशाला ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि माझ्याकडे हे सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत,” असा दावा तिने एका चर्चा सत्रात केला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांकडून तिची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे.
या निमीत्ताने रूचीवरच नाही तर भाजप पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पण तीव्र टीका केली जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, लल्लनटॉप या माध्यमाने एक चर्चासत्रात रुची पाठक सहभागी होती.
कॉंग्रेसवर टिका करतांना ती म्हणाली, “ब्रिटीश क्राऊनने भारताला ९९ वर्षांच्या भाडेकराराने स्वातंत्र्य दिलं आहे आणि यालाही काँग्रेसच जबाबदार आहे. तुम्ही इतिहासाची पानं चाळून पाहा. जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन चालू होतं आणि पंडित नेहरु व महात्मा गांधी नेतृत्व करत होते, त्यावेळी ब्रिटीशांना आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं. त्यावेळी निवडणुका नसल्याने नेहरु आणि गांधीजींनी ब्रिटीश क्राऊनची शपथ घेतली होती. त्यामुळे आज मिळालेलं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेकरारावर मिळालेलं आहे. मी याचे पुरावेही तुम्हाला देऊ शकते”, असही ती पुढे म्हणाली होती.

Leave a Reply