क्षुल्लक वादातून केली शेजाऱ्याची हत्या

भंडारा : २९ ऑक्टोबर – क्षुल्लक वादातून ५० वर्षीय इसमाची गळा चिरून हत्या केल्याची घटना काल रात्री १० वाजताच्या सुमारास मोहाडी येथे घडली आहे. गंगाधर उर्फ बंग्या नत्थू निमजे असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी आकाश विजय श्रीपाद (२२) रा. गांधी वार्ड मोहाडी याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी आकाश व मृतक गंगाधर हे एकमेकांचे शेजारी शेजारी होत. काल रात्रीच्या सुमारास रात्री गंगाधर दारू पिऊन आरोपी आकाशच्या घरी गेला होता. यावेळी काही कारणावरून आकाशच्या आईसोबत भांडण झाले. यानंतर गंगाधरने त्यांच्या घरच्या मारोती ओमनी वाहनाची तोडफोड केली. हा प्रकार आकाशला माहित होताच त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने सायकलचा काटेरी गियर गंगाधर निमजे याच्या गळ्यावर मारला. यात गंभीर जखमी झालेल्या अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वतःच पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली व घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक राहूल देशपांडे याच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव, पोलिस हवालदार मुकेश भोंगाडे, दुर्योधन भुरे, सोमेश्वर सेलोकर करीत आहेत.

Leave a Reply