प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाला २ हजाराची लाच घेताना अटक

वर्धा : २८ ऑक्टोबर – आष्टी तालुक्यातील साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक देविदास ठाकरे (४८) याने वेतन व इतर भत्त्यांबाबतचे देयक दिल्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेतल्यानेे त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून त्याला अटक केली. ही घटना काल २७ रोजी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्राथमिक आरोग्य केंद्र साहुर येथे औषध निर्माण अधिकारी आहेत. त्यांचे प्रलंबित असलेले वेतन, भत्ते व सण अग्रीम मिळवून दिलेे. त्यासाठी ठाकरे याने मोबदला म्हणून ३ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथील कार्यालयात तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथील पोलिस निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे यांनी तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तडजोडीअंती २ हजार रुपये कार्यालयात स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा येथील पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध आष्टी पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाही पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक गजानन विखे, पोलिस निरीक्षक सुहासिनी सहस्त्रबुद्धे, रोशन निंबोळकर, सागर वैद्य, कैलास वालदे, प्रदीप कुचनकर, निलेश कुचनकर यांनी केली.

Leave a Reply