एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारले बेमुदत उपोषण

नागपूर : २८ ऑक्टोबर – अल्प वेतनामुळे एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची व मानसिक स्थिती खालावत आहे. अशास्थितीत २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे सत्र अद्यापही कायम आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांनी युनियन कृती समितीच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण पुकारले आहे.
राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता, ८,१६,२४ टक्के घरभाडे भत्ता व ३ टक्के वार्षिक वेतनवाढ आहे. तर एस. टी. कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता, ७,१४,२१ टक्के भत्ता व २ टक्के वार्षिक वेतनवाढ आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ देण्याचे कामगार करारात लेखी मंजूर केले आहे. त्यानंतरही ते या कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी झाले आहे. अशातच शासनाने १६ टक्के एवजी फक्त ५ टक्के महागाईभत्ता देण्याचे जाहीर केले. परिणामी, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. यातून कर्मचाऱ्यांनी उपोषण पुकारले. उपोषणाकरिता एस. टी. महामंडळातील १८ युनियन एकत्र येऊन कृती समिती तयार केली. शहरात झालेल्या आंदोलनात प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार, विभागीय सचिव प्रशांत बोकडे, विभागीय कोषाध्यक्ष प्रज्ञाकर चंदनखेडे, विभागीय कार्याध्यक्ष राजू मुडवाईक, जगदीश पाटमसे, माधुरी ताकसांडे, शशी वानखडे, प्रवीण पुणेवार, सुनील राठोड, प्रादेशिक सचिव अरुण भागवत, अतुल निंबाळकर, विलास मते, संदीप गडकीने, मनीषा कालेश्वर, कविता लांजेवार, प्रमोद डिमोले अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply