वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

” भिऊ नका मी तुमच्या पाठी ! “

आज राज्यातील सरकारची वर्तणूक पाहून कोणत्याही सुजाण नागरिकाला
“अरे या राज्यात शासन कुणाचं आहे ?”
असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे !
हे शासन देशहिताची चिंता बाळगणाऱ्या , समाजाशी बांधिलकी मानणाऱ्या देशभक्तांचं , कि,
केवळ आपला, आपल्या कुटुंबीयांचा,
चेलेचपाट्यांचा स्वार्थ साधणाऱ्या मवाली गुंडांचं !
हाही भाव मनात येणं स्वाभाविक आहे !
कारण प्रत्येक वेळी ते सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभं रहायचं सोडून
गुंडांची,खंडणीबहाद्दरांची,ड्रग माफियांची,आतंक्यांचीच बाजू घेतांना दिसतात !
निस्वार्थी, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी रहायचे सोडून,
त्यांचाच छळ करतांना दिसतात !
त्यांच्याच मागे शुक्लकाष्ठ लावतांना दिसतात !
पण, यात ते काही फार मोठी चूक करतात असं मला तरी वाटत नाही !
कारण, आपल्या माणसांना जर कोणी
त्रास देत असेल तर त्याचा बदला घेण्यातही काही गैर नाही !
लहान भावंडांची काळजी घेणे हे मोठया भावाचं कामच असते !
त्याच्या संकटसमयी “भिऊ नका मी तुमच्या पाठी ” (!) म्हणून त्यांना मदतीचा हात (!) देणे !
हे मोठ्या भावाचं कर्तव्यच ठरते !
प्रजाहितापेक्षा ‘भाई-चारा ‘ अधिक महत्वाचा आहे !
आणि,’ पाण्यापेक्षा रक्त अधिक घट्ट असते ‘ हेच खरं आहे !

        कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply