नागपूर पोलिसांची अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई, ६ तासात ६६ आरोपी ताब्यात

नागपूर : २७ ऑक्टोबर –अंमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर पोलिसांची धडक कारवाई केली आहे. यादरम्यान नागपूर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तब्बल ६६ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
नागपुरात अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याने शहरातील गुन्ह्यातंही वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार नागपूर शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
या कारवाईदरम्यान पाच जणांना अंमली पदार्थ बाळगताना, तर ६१ जणांना अंमली पदार्थ सेवन केल्यामुळे ताब्यात घेतलं आहे. यापूर्वी नागपूर पोलिसांनी क्रिकेट बुकी आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली होती. नागपूर पोलिसांनी दोन दिवसांत दोन धडक कारवाया पार पाडल्या आहेत.

Leave a Reply