नागपूरकरांच्या चित्रपटाला मराठीचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर : २५ ऑक्टोबर – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील मराठी भाषा गटात “बार्डो” ने बाजी मारत प्रथमच नागपूरचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला आहे. राजधानी दिल्लीत काल झालेल्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या चित्रपटाच्या यशात तीन नागपूरकरांचे मोलाचे योगदान आहे. याची निर्मिती प्रसिद्ध युवा टेस्ट ट्यूब बेबी तज्द्न्य डॉ. निषाद नटचंद्र चिमोटे यांच्या पांचजन्य प्राँडक्शनने केली आहे. साँफ्टवेअर इंजिनियर व संगीतकार रोहन गोखले यांचे संगीत असून, अभिनेत्री श्वेता पेंडसे यांनी “बार्डो” ची पटकथा लिहिली आहे.
भगवान बुद्धाच्या संकल्पनेप्रमाणे मृत्यू व पुनर्जन्म या कालाच्या अंतराळात चालत राहणारी वैचारिक, भौतिक अनागोंदी किंवा गोंधळाची अवस्था म्हणजे बार्डो. त्याचे चित्रण यात आहे. 
प्रसिद्ध कलावंत अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अशोक समर्थ, श्वेता पेंडसे यांच्या सशक्त अभिनयाला भीमराव मुढे यांनी दिग्दर्शित केले आहे.
चित्रपट क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार नागपूर-विदर्भाच्या वाट्याला प्रथमच आल्यामुळे सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply