संस्थसंचालकाने केला महाविद्यालयातील परिचरावर गोळीबार

भंडारा : २४ ऑक्टोबर – लाखनी शहरातील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या परिचराला बंदुकीने गोळी मारल्याची गंभीर घटना सकाळी ७. ३० वाजता विदर्भ महाविद्यालयात घडली. जखमीवर नागपूर येथे उपचार सुरू असून संस्था चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
सुभाष गोपाल आगाशे असे गंभीर पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. संस्थाचालक असलेल्या अमित हुकुमचंद गायधनी हे नवशक्ती पीठ शिक्षण संस्था मुरमाडी/सावरी मध्ये सहसचिव असून या संस्थे अंतर्गत असलेल्या विदर्भ महाविद्यालय लाखनी येथे भूगोल विभाग प्रमुख म्हणून नोकरी करतो. भाजप पक्षामध्ये उच्चपदस्थ पदाधिकारी म्हणून काम करीत आहे. आपल्या राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळखीचा फायदा घेत महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांशी नेहमी अरेरावीची भाषा केली जात असल्याची चर्चा आहे. आजही आकसापोटी सदर संस्थाचालकाने कर्तव्यावर कार्यरत असलेले परिचर सुभाष आगासे यांच्यावर एअर गनने गोळ्या झाडल्या. यामुळे मुसदर परिचराच्या छातीजवळ गंभीर दुखापत झाल्याने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी भरती करण्यात आले आहे. जखमी आगाशे यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून लाखनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संस्था चालक गायधनी याला लाखनी पोलिसांनी भंडाऱ्यात अटक केली आहे.

Leave a Reply