वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

भिकारडा नबाब !

एक भिकारडा नबाब ,
कोणत्या गावातला/गल्लीतला ते माहीत नाही ,
पण जेव्हा मंत्र्यांच्या खुर्चीत बसून
एका सनदी अधिकाऱ्याला धमकी देतो, कि, तुला जेलात घालीन,तुला नोकरीतून काढीन, तेव्हा,
सामान्य माणसाचा मायबाप सरकारवरचा विश्वास द्विगुणित होईल कि नाही ?

एक बड्या बापाच्या शांतिदुतपुताला ड्रगच्या आरोपावरून अटक झाल्यापासून ,
त्या पोराचा बाप राहिला बाजूला ,पण,
या नबाबालाच पिसाळलेला पाहून लोकांना हाच तर त्या पोराचा बाप नाही ना ,असं वाटेल कि नाही ?

बरं हिरवे पक्ष त्याला सोडवायला सरसावले तर तेही आपण समजून घेऊ , पण,
स्वतःला भगवे म्हणवणारेसुद्धा जेव्हा त्या नशेखोराला सोडवण्यासाठी
सुप्रीम कोर्टात जातात ! , तेव्हा ,
लोकांना त्यात त्यांची ‘भूत’दया’ प्रत्ययास येईल कि नाही ?

सारे हाडुकजीवी पत्रकार, शॅम्पेनजीवी विद्वान !
जेव्हा” हाय आर्यन ! हाय आर्यन ! करत,
आकाशपाताळ एक करत , रात्रंदिवस
छाती पिटत आहेत , तेव्हा ते ,
लोकशाहीला बळकट करत आहेत असेच लोकांना वाटेल कि नाही ?

आणि लोकशाही म्हणजे शाही लोकांनी, शाही लोकांना मनमानी करण्याची दिलेली ग्वाही — म्हणजे लोकशाही !
या उक्तीवर त्याची श्रद्धा अधिक बळकट होईल कि नाही ?

             कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply