वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

बारामतीचे राष्ट्रपती !

का काजी , इतकेही निराश होऊ नका
नाहीतर , डिप्रेशनमधे जाल !
पंतप्रधानांच्या हत्येच्या धमक्या द्याल
तर नाहक बिनभाड्याच्या खोलीत रवाना व्हाल !
महाराष्ट्रातिल आत्महत्या करणाऱ्या अन्नदात्यांची काळजी करण्याऐवजी
तुम्ही काळजी करताय पंजाबातील दलालांची ! खलिस्तान्यांची ! आतंकवाद्यांची !
देशातील ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईची काळजी करण्याऐवजी , तुम्ही काळजी करताय
त्या ड्रग ऍडिक्ट खानबाळाची !
देशाला गिळू पाहणाऱ्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाची मुंडी आवळण्याऐवजी
तुम्ही काळजी करताय तुमच्या लाडक्या खंडणीबाज फरार मंत्र्याची !
देशातील एकशेतीस कोटी जनतेच्या
योगक्षेमाऐवजी तुम्ही काळजी करताय
भ्रष्टाचारात आकंठ बुडलेल्या फक्त आणि फक्त तुमच्या एका परिवाराची !
शेवटी हेच खरं कि, लाकडं मसणात गेली तरीही
माणसाचा हावरटपणा काही जात नाही !
हजारो वर्षांपूर्वी आचार्यांनी जे सांगितलं ते अजिबात खोटं नाही !
” अंगं गलितं पलितं मुंडम्
दशनविहीनं जातं तुंडम्
वृद्धो याति गृहीत्वा दंडम्
तदपि न मुंचत्याशापिंडम् ।।”
खरंच काका , तुमचा आशापिंड
फारच फारच बलवान आहे !
म्हणूनच तुमची ओळख अखेर
” बारामतीचे राष्ट्रपती ” हीच रहाणार आहे !

कवी — अनिल शेंडे .

Leave a Reply