भंडाऱ्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दीड कोटींची अफरातफर, ५ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

भंडारा : २१ ऑक्टोबर – भंडारा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आसगाव शाखेत तब्बल दीड करोड रुपयांची अफरातफर करण्यात आली असून याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी प्रमोद पडोळे रा. मांगली यासह शाखा व्यवस्थापक उमेश कापगते, सहायक व्यवस्थापक आशिष आटे, कमलाकर धार्मिक व सी.एस.सी. कंपनीचे विभाग व्यवस्थापक दुर्गेश भोंगाडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पवनी तालुक्यातील आसगाव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आरोपी प्रदीप पडोळे याची बाचेवाळी येथे बिजनेस कॉर्पोरेशन या पदावर २०१८ पासून नियुक्ती करण्यात आली होती. त्याने नियुक्तीपासून आसगाव येथील बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या शाखेत बसून ग्राहकांचे बायोमॅट्रिक मशिनद्वारे बँकेत पैसे काढण्याचे व जमा करण्याचे काम सुरू केले होते. त्याच्या आर्थिक व्यवहाराकरिता बँक शाखेने स्वतंत्र्य ओडी क्रमांक बनवून दिला होता. दरम्यान बँकेच्या एका खातेदारकाने आपल्या खात्यातून २ लाख ४९ हजार रुपयाची रक्कम विड्राल करण्यात आल्याची तक्रार केली होती. खातेदारकांच्या तक्र्रारीवरून याबाबत सखोल चौकशी लेखापरिक्षण केले असता आरोपी प्रमोद याने १ कोटी ५० लाख रुपयाची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले.
बँकेत बसून स्वताला बँक कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांकडून पैसे जमा करणे, एकाच वेळी अनेक विड्राल फ्रार्मवर ग्राहकांच्या सह्या व अंगठे घेऊन ठेवणे, या विड्राल फार्मच्या आधारे नंतर ग्राहकांच्या खात्यावरील पैसे स्वताच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने वळते करणे तसेच बायोमॅट्रिक मशिनचा दुरुपयोग करून बँक ग्राहकांच्या अंगठ्याच्या गैरवापर करीत आपल्या खात्यावर पैसे वळते करणे. याशिवाय आपल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने वळविलेले पैसे खोटे फिक्स डिपाजीटच्या पावत्या तयार करून खोटे बीसी कोडचे सिक्के मारून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार प्रमोद पडोळे या महाभागाकडून करण्यात आला. तर या सर्व प्रकारावर नियत्रंण ठेवण्याचे अधिकार असताना बँक कर्मचारी उमेश कापगते, आशिष आटे, कमलाकर धार्मिक व दुर्गेश भोंगाडे यांनी कर्तव्यात कसुराई केल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे सेेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक हर्षकुमार हरिदास जामगंडे (३५) यांनी पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केेला आहे.

Leave a Reply