देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात ३६ चा आकडा – विजय वडेट्टीवार यांचे खळबळजनक विधान

नांदेड : २१ ऑक्टोबर – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात खळबळजनक वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात ३६ चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलत असताना वडेट्टीवार बोलत होते. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केला.
‘भाजपमध्ये दोन टोकं आहेत. एकीकडं नितीन गडकरी आहेत तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. फडणवीसांची मला जिरवायचीच होती आणि जिरवून टाकली. आता पुन्हा जिरवणार आहे असं गडकरी मला एकदा बोलता बोलता म्हणाले होते,’ असा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केला होता.
तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या विरोधात तसेच नेत्यांच्या निकटवर्तीच्यां विरोधात ईडीकडून कारवाई सुरू आहे. या कारवाईवरुन राजकीय वातावरण तापलेले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यावर भाष्य करताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. आज आमची तर उद्या तुमची वेळ असं म्हणत चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं आहे.
ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यावरून कॉंग्रेसचे मदत आणि पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटील यांना आव्हान दिले. विजय वडेट्टीवार म्हणाले, नांदेड की बारी…. काही हरकत नाही, उद्या तुमची बारी असेल. सत्ता कोणाच्या बापाची नेहमीसाठी नसते लक्षात ठेवा. सत्ता बदलत असते आणि सगळ्यांची घर काचेची आहेत. किमान खिडकी तरी काचेची असते. दगड तर पडणार… असेही ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक सुरू आहे. देगलूरमध्ये आयोजित प्रचार सभेत विजय वडेट्टीवार यांनी हे विधान केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटलं, केंद्रात आमची सत्ता आल्यास आम्ही देखील अशीच कारवाई करू.

Leave a Reply