वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

काकऋषींची काकवाणी !

” पाहुण्यांनी पाहुण्यासारखं रहावं , अजीर्ण होतपर्यंत पाहुणचार घेऊ नये “
ही ‘काकवाणी’ कानावर पडली आणि आम्ही अक्षरशः उडालोच !
आणि गहन विचारात बुडालोसुद्धा !
आतापर्यंत काकांना शकुनी, शकुनीपुत्र , खंजीरवाले, असली विशेषणं लावणाऱ्या अस्मादिकांचीच आम्हाला कीव येऊ लागली !
काकांची प्रतिमा आता आम्हाला ‘ईशावास्योपनिषद’ सांगणाऱ्या ऋषीप्रमाणे भासू लागली !
“इशावास्यमिदं सर्वम् यत्किम् च जगत्यां जगत् ।”
आणि काकांचा वरील उपदेश यांत आम्हाला विलक्षण साम्य दिसलं ! आणि,
काकांचं थोरपण आमच्या मनोमनी अधोरेखित झालं !
“हे सर्व जग ईश्वराचं असून आपण या पृथ्वीवर चार दिवसांचे पाहुणेच आहोत, अजीर्ण होतपर्यंत माणसाने पाहुणचार घेऊ नये ” हा उपदेश काकांनी समर्थांप्रमाणेच स्वतःच्या मनालाच केला याबद्दलही आम्हाला संदेह नाही ! कारण ,
काकांइतका पाहुणचार या महाराष्ट्रात तरी आजवर कुणीही घेतला नाही !
अजीर्ण होतपर्यंत खा खा खाल्लं नाही !
स्वतः चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आता खासदार, मुलगी खासदार, पुतण्या उपमुख्यमंत्री,
एक नातू खासदार, दुसरा आमदार ,
कितीतरी कारखाने,कम्पन्या, सहकारी संस्था यातून अब्जोंचा माल खाऊन खाऊन त्यांना अजीर्ण न झालं तरच नवल !
आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मनाला केलेला वरील उपदेश आम्हाला अतिशय भावला !
आणि त्यांना ” काकर्षी ” या उपाधीने
मंडित करण्याचा आम्ही निर्णय घेतला!

       कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply