वाशिममध्ये ३ कोटी ४५ लाखांचा गांजा जप्त

वाशीम : १९ ऑक्टोबर – रिसोड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केलेल्या कारवाईत ३ कोटी ४५ लाख रुपयाचा साडेअकरा क्विंटल गांजा रिसोड पोलिसांनी जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीनुसार हिंगोली ते रिसोड रोडने आयशर ट्रकमध्ये गांजा ची वाहतूक होत आहे, अशा प्रकारच्या माहितीवरुन पोलिस अधीक्षक बच्चन सिहं, अपर पोलिस अधीक्षक गोरख भामरे, उप विभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सारंग नवलकार व त्यांच्या सोबत अधिकारी व पो कर्मचारी यांनी हिंगोली ते रिसोड रोड वर सापळा रचून आयशर ट्रक क्र एमएच २८ बीबी ०८६७ मध्ये झडती घेऊन आरोपी गोटीराम गुरुदयाल साबळे (वय५२) रा. कुर्हा ता. मोताळा, सिद्धार्थ भिकाजी गवांदे रा. निमगाव ता. नांदुरा, प्रवीण सुपडा चव्हाण रा. हनवतखेड ता. मोताळा, संदीप सुपडा चव्हाण रा. हनवतखेड ता. मोताळा जि. बुलडाणा यांना गांजाची वाहतूक करतांना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून एकूण ५६ कट्टे (पोते), ११ क्विंटल ५० किलो गांजा किंमत ३ कोटी ४५ लाख व आयशर ट्रक वाहन किंमत २० लाख रुपये असा एकूण ३ कोटी ६५ लाख रुपये चा माल मिळून आला. सदर ची कारवाई मध्ये रिसोड पोस्टेचे पोनि सारंग नवलकार, पोउपनि संतोष नेमणार, पीएसआय शिल्पा सुरगडे, अनिल कातडे, भागवत कष्टे, सुशील इंगळे, गुरुदेव वानखडे, यांनी सहभाग नोंदविला आहे.

Leave a Reply