वाघाच्या शिकारप्रकरणी यवतमाळमधून आणखी चौघांना अटक

नागपूर : १९ ऑक्टोबर – वनविभागाच्या विशेष पथकाने यवतमाळमधील वाघाच्या शिकार प्रकरणात ७ आरोपींना अटक केल्यानंतर चौकशी आणखी चौघांना अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून शिकारीनंतर जंगलात लपवून ठेवलेले १० किलो ३०० ग्रॅम वजनाची वाघांची हाडे आणि अवयव जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या किटा खापरी गावातील चौघांना अटक करण्यात आली आहे.
यवतमाळ तालुक्याच्या कीटा खापरी भागात मार्च २०१८ मध्ये एक वाघाची शिकार करण्यात आली. यात वाघाची शिकार करून त्याचे अवयव प्रकरण शांत झाल्यानंतर किमान दोन-तीन वर्षांनी विकण्याचा बेत शिकरींचा होता. तोच बेत साध्य करण्यासाठी वाघाच्या अवयव विक्रीस काढले असताना वन विभागाच्या विशेष पथकाला माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे वन उप वनसंरक्षक डॉ.भरत सिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख नरेंद्र चांदेवर यांनी सापळा लावून नागपूर हळदगाव वर्धा मार्गावर सात जणांना अटक केली. यात सात जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला.
सुरुवातीला सात जणांना अटक करण्यात आली तेव्हा यातील मुख्य सूत्रधार यांनी वन विभागाला खोटी माहिती दिली. यात मुख्य आरोपी वाघाची शिकार केल्यानंतर त्या व्यक्तीने फाशी घेऊन मरण पावला. यामुळे आमचा काही दोष नाही, असे तो भासवत होता. पण वन विभागाला त्याचा संशय असल्याने त्या नावाचा कोणताच मृत व्यक्ती नव्हता असे पोलिसांकडून समजले. तसेच वाघाची शिकार उमरडा भागात झाल्याची खोटी माहिती दिली.
वन विभागाने चौकशी दरम्यान वाघाच्या अवयवांचे काय केले याची माहिती घेत घटनास्थळ गाठले. आरोपीने किटा खापरी परिसरातील जंगलात जिथे सहसा कोणी जात नाही अशा ठिकाणी वाघाची शिकार करून त्याच भागात त्या वाघाचे अवयव जमिनीत पुरवल्याची माहिती दिली. यात वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक ४६९ मधून शिकार केलेल्या वाघाची हाडे हे जमिनीतून बाहेर काढून जप्त केली. यावेळी तब्बल १० किलो ३०० ग्रॅम वजनाचे हाडे जप्त करण्यात आले.
या प्रकरणात आरोपी हे जंगल भागात पाळीव प्राणी चराईसाठी नेत असल्याने त्यांना या वाघाबद्दल माहिती मिळाली असावी, असा संशय आहे. पाच जणांना यात वाघाची शिकार केली. त्यानंतर काही अवयव हे आपापसात वाटून घेतले. यात प्राण्यांचे अवयव औषधी बनवण्यासाठी वापरत असून ते अवयव जवळ ठेवत इतर अवयव जमिनीत पुरले. शिकार करणारे ५ आरोपी असून इतर ७ आरोपी हे अवयव विक्रीच्या अनुषंगाने यात गुंतले आहेत. आतापर्यंत ११ आरोपींना या प्रकरणात अटक झाली असून पुढील तपासात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply