चंद्रपुरात ५ वर्षीय चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार

चंद्रपूर : १९ ऑक्टोबर – स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या अर्जुनी येथे रात्रीला एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, नवरात्री महोत्सव निमित्ताने शारदा देवी जवळ महाप्रसादचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम रात्री ९ वाजेपयर्ंत सुरू होता, रात्री जेवण करून घरी जात असता अल्पवयीन मुलगी एकटी पाहून मोहल्ल्यात राहणारा नराधम आरोपी शंकर गणेश गजभे याने त्या पाच वर्षीय मुलीचा हात धरून रस्त्यालगत असलेल्या गुराच्या गोठय़ात नेले व तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार करीत असल्याचे दृश्य एका महिलेने पाहिले. सदर महिलेने कसलीही पर्वा न करता सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. तेव्हा आईने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित अल्पवयीन मुलीसह पोलिस स्टेशन गाठले व सर्व प्रकार येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांना सांगितला. आरोपी शंकर गणेश गजभे (वय २७) याच्यावर कलम ३७६ ए.बी. ३७६ (२) (जे) भांदवि सहकलम ६ पोस्कोनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. सदर प्रकरणाचा अधिक तपास येथील ठाणेदार अविनाश मेर्शाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहे.

Leave a Reply