देवीच्या विसर्जनाला गेलेल्या पिता-पुत्राचा तलावात बुडून मृत्यू

अकोला : १८ ऑक्टोबर – स्थानिक शिवसेना वसाहत येथील पिता-पुत्र कुरणखेड येथील तलावामध्ये रविवारी रात्री देवी विसर्जन करताना बुडाल्याची घटना घडली होती. या पिता-पुत्रांचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळला. शिवसेना वसाहत येथील पिता-पुत्र देवी विसर्जनासाठी कुरणखेड येथील चंडिका माता संस्थान मागील तलावावर गेले होते . यावेळी देवी विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने पिता सुनील वाघाळकर हे पाण्यात उतरले आणि त्यांना बुडताना असल्याचे पाहून पुत्र अभिषेक वाघाळकर पाण्यात उतरला आणि तो सुद्धा बुडाल्याची दुःखद घटना रविवारी रात्री घडली. रात्रीच्या अंधारामुळे तपासात अडचण येत होती. सोमवारी सकाळी बचाव पथकाने शोध घेतला दोघांचाही मृतदेह आढळला. कुरणखेड येथील श्री.चंडिका माता आपत्कालीन बचाव पथक,व वंदे मातरम आपत्कालीन बचाव पथक कुरणखेड. यांच्यातर्फे शोध मोहीम करण्यात आली. पिता-पुत्राच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply