अन्यथा मोदींचे अस्तित्वच संपले असते – भास्कर जाधव यांची भाजपवर चौफेर टीका

रत्नागिरी : १८ ऑक्टोबर – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले म्हणून आज मोदी पंतप्रधान आहेत हे विसरू नका अन्यथा मोदी यांचे अस्तित्व केव्हाच संपले असते, अशा शब्दात कोकणात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर तोफ डागली आहे. भाजप सूडबुद्धीने वागत आहे. ईडी, एनसीबी, सीबीआय, इन्कम टॅक्स अश्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोपही यावेळी भास्कर जाधव यांनी केला आहे
भाजप शिवसेनेचं बोट धरून केवळ राज्यात नाही तर देशात वाढली तीच भाजप आता सेनाभवन तोडण्याची भाषा करू लागली आहे. काही तासांच सरकार राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आमचा विश्वासघात कोणी केला? कसा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही समाजार घेतला.
आमच्यासाठी खड्डा खणला पण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कल्पकतेमुळे भाजप स्वतःच खड्ड्यात पडली. ही आम्हाला लाभलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची देणगी आहे. शिवसेना विरोधात भाजपची सोशल मीडियावर ही लढाई आहे. त्याला शिवसैनिकांनीही रोख ठोक शैलीत सोशल मीडियावरच उत्तर दया, असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.
केवळ शिवसेनेला खालच्या पातळीवर टार्गेट करत आहेत मुंबई महानगरपालिकेतून मराठी माणसाला बाहेर काढायचे असा मोठा डाव आहे. गुजरात दंगलीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहिले म्हणून आज मोदी पंतप्रधान आहेत हे विसरू नका अन्यथा मोदी यांचे अस्तित्वच संपले असते, हे लक्षात ठेवा अशी बोचरी टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही भास्कर जाधव यांनी आज समाचार घेतला. ‘ज्यावेळी सरकार बनत नव्हते त्यावेळी ८६ तासांचं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार कोणी बनवलं ? भाजपनेच ना? मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला? तीन पायाचं सरकार म्हणून महाविकास आघाडीला हिणवणाऱ्या भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का? ते सांगावं, असा थेट सवालही जाधव यांनी केला आहे.

Leave a Reply