सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

झोला

दस-याचे माननीय मुख्यमंत्री (मामु) चे भाषण ऐकले आणि महाराष्ट्र राजकारणाचा स्तर कसा घसरत घसरत लोकांना घायकुतीला आणुन, सगळ्यात खालच्या स्तरावर आला आणि प्रत्येक दिवस हा स्तर निच्चांकाची पातळी गाठण्यात विक्रम तोडतोय. महाराष्ट्राची अधोगती दुसरे काय!!
सुमार टुच्चू भाषण प्रगती कमी – राजकारणातील अधोगती जास्त. मामु कामाचे कमी बोलला पण खट्से खोला तो कोकाकोला. नेहमीची रौडी गुंडाची भाषा अंगावर याल तर….. मी पुन्हा येईन ….ची खिल्ली…. विपक्षी नेत्यांचे फिरवलेले शब्द….. त्यावर शाब्दिक कोट्या…… समोरच्या ओळीतले दोन चार चमचे त्यांनी वाजवलेल्या टाळ्या…. टाळ्यांनी चेकाळलेला मामु…..मग अजून दोन चार शाब्दिक बाण विरोधकांवर…… गुंडगिरी ची भाषा…..भाषण संपले. ब्रॅंड अम्बॅसेडर राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिडिया माईकवर सांगत होते की संपूर्ण भारताचे लक्ष्य ठाकरेंच्या भाषणाकडे लागले आहे. आता सध्या मविआ सरकार इतके दाबुन खाऊन राहिले आहे की हा पैसा केव्हा आपणाला राष्ट्रीय स्तरावर वापरून ठाकरेंना पंतप्रधान बनवतो, असे ह्या सरकारला झाले आहे, असे वाटते.
एखाद्या पार्टीने पतिव्रत्याचा त्याग केला. दुस-या वैचारिक विरोधी पक्षांचा संग केला, रखेलत्व स्विकारले की जितके उपभोग्य, तितके सगळे उपभोग घ्या. ह्या वृत्तीत समाविष्ट झालेली शिवसेना, सध्या भल्या बु-या विचारांची शहानिशा न करता. सद्यपरिस्थितीत अवैध रित्या चालू असणा-या ड्रग्स माफियांकडून बोलणे. गांज्याला आयुर्वेदिक वनस्पती अशा शब्दरचनेत गांजा व्यापा-यांना आणुन कायदेशीर सुटकेचा मार्ग शोधणे. ही वैचारिक दिवाळखोरी नाही तर हा महाराष्ट्र राज्याचा आगामी काळातील एक मोठा धोका आहे. पंजाब चे “उडता पंजाब” हे सुंदर उदाहरण देता येईल. अशा “उडता महाराष्ट्र” संकल्पनेला साकार रुप देण्यात व्यस्त मविआ सरकार आणि त्याला दुजोरा पाठिंबा अर्थातच् आपला मामु. ड्रग्स अवैध आहेत आणि त्यांचा व्यापार करणारे व्यापारी गण सुद्धा अवैधच् राहणार. अशा लोकांना तुम्ही संरक्षण देण्याचा ध्यास धरताय, याचा अर्थ मराठी अस्मितेचा लोप करण्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे सरकते आहे. असे म्हणण्याला भरपूर वाव आहे.
ज्या देशात मोदी, शहा हे ड्रग्स सेवन करण्याने पिढी बरबाद होते, मुलं घरदार बरबाद होतात, आई-बाप मुलांच्या भल्यासाठी राब राब राबतात. म्हणून देशातून ड्रग्स हद्दपार करण्यासाठी जीवतोड मेहनत घेताहेत तर अशा परिस्थितीत जर महाराष्ट्र सरकार युवा पिढीसाठी ड्रग्स चे दरवाजे खुले करणार असतील तर ह्या शिवसेनेच्या “हिंदू त्व” ह्या शब्दाची शहानिशा आवश्यक आहे. पाला बदलला, पतिव्रत्य सोडलेला पक्ष रखेल बनला की शब्द बदलतात, शब्दांचे अर्थ बदलतात, मुलभूत व्याख्या बदलतात, पक्षाची दिशा बदलते. तद्वतच शिवसेनेच्या व्याख्या बदलल्या, दिशा बदलल्या आहेत. त्यांचे विचार आता त्यांच्या मालकिय हक्क असणा-या पक्षाचे झाले आहेत. पण शिवसेनेला जिवंत ठेवायचे तर “हिंदुत्व” पक्षात आहे हे दाखविणे तितकेच् गरजेचे. हिंदू विरोधी विचारधारा असणा-या पक्षांसोबत राहुन मलाई चाटायची आणि हिंदू मतं फुटायला नको म्हणून हिंदुत्ववादी तत्वज्ञान पेलणे मामु ला आवश्यक होते. म्हणून काल मामु ने आपले हिंदू शब्दधनाचे अज्ञानयुक्त शब्दाचे वज्राघात करायचे खुप प्रयत्न केले पण मोदी, भागवत ह्यांचा व्यासंग कुठे! ह्यांच्या जीवनाचे समर्पण तत्व कुठे! आणि मामु चे स्वार्थी जीवन कुठे! अभ्यासहीन भाषण कुठे! सांगोपांगी अर्थोअर्थी संपुर्ण भाषण अर्थहीन – दिशाहीन – भरकटलेले.
दुस-या एका भाषणात त्यांनी भावनात्मक खेळी खेळली. ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे त्यांनी दिलेले संस्कार, मग बाळासाहेबांनी दिलेले संस्कार. ह्या सर्व संस्कारांच्या सानिध्यात वाढलेला मी. वंशपरंपरेने माझ्याकडे आलेले “शब्दधन” त्याचा उपयोग म्हणून मी शाब्दिक कोट्या करु शकतो. वगैरे वगैरे…
मामु तुला “झोला” शब्दाचा अर्थ कळला नसेल नं तर व्यर्थ तुझी धनसंपदा. “झोला” ह्या शब्दाचा अर्थ आहे – निस्वार्थ जनसेवा – विनामूल्य जनसेवा – परोपकारासाठी देह झिजावा. मी कुठल्याही पक्षाचा नाही पण मोदीचा कायल आहे. का???? मामु वीस वर्ष सत्तेचे आणि भ्रष्टाचाराचा डाग नाही मोदीवर. ज्वलंत हिंदुत्वाची तेवत असणारी अखंड ज्योत म्हणजे मोदी. आणि मुख्य म्हणजे हिंदू तत्वांना धरुन जगणारा पंतप्रधान म्हणजे मोदी.
मामु वरच्या पॅराग्राफ मध्ये कुठेतरी तू फिट बसतोयस का?? केवळ अहंकारासाठी प्रखर हिंदुत्ववादी पक्षाची साथ सोडणारा तू. दोन वर्षात किरीट सोमय्या नी शेकडो भ्रष्टाचाराचे, जमिनीचे घोटाळे करणारा तू. “हिंदुत्व” हा शिवसेनेचा गाभा पण पालघर संतांची हत्या झाल्यावर, तुझा हिंदुत्वाचा राग कदाचित उफाळून आला ही असेल, पण रखेलत्वाला स्वतः चा राग मुग गिळून गप्प बसावा लागतो. त्याप्रमाणे तुझी स्थिती झाली असावी मान्य आहे. पण हळूहळू हा रखेलत्वाचा चोला ओढल्यावर तुझ्या मालकानी तुझा हिंदुत्वाचा चोंगा सगळ्यांसमोर उतरविला आणि तुला मामु पालघर संतांना न्याय देता आला नाही. अरे ज्याने स्वतः च्या वडिलांसमोरची “हिंदू हृदय सम्राट” ही उपाधी फक्त बाळासाहेबांना दिलेल्या वचनासाठी काढली असेल तर तुमच्या नियत मध्ये खोट आहे,असे म्हणण्यास वाव आहे.
तुमचे धन किती आणि मोदींचे धन किती? तुमचा मातोश्री दोन, असंख्य जमिनी (सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे) तुमचे विकाऊ हिंदुत्व, तुमचे रखेलत्व, मामु तुम्ही वाझेबॉंड वसुली, त्राहिमाम हिंदू जन, अनिल देशमुख पकडू नाही शकला. मामु तुम्ही पण परमबीर पकडू नाही शकला. ड्रग्स व्यापा-यांचे समर्थनार्थ बोलताय मामु तुम्ही. “आजपर्यंत सगळ्यात भ्रष्ट सरकार” ह्या फडणविसांच्या विधानाला खोडण्याची तुमची हिंमत नाही.मामु ओरबाडून घेतलेली मुख्यमंत्र्याची खुर्ची त्यासाठी सर्वांदेखत फेडलेली हिंदुत्वाची वस्त्रे आणि अहंकारापोटी ओढवून घेतलेलं रखेलत्व. मामु तुझ्या भ्रष्ट पैशाचा झोला, फेक हिंदुत्वाचा झोला, सत्तेसाठी गोल टोपीचा झोला सगळे पुर्णपणे भरला आहे पण नैतिकतेचा झोला, पारदर्शी नितिमत्तेचा झोला पुर्णपणे रिकामा आहे. मामु तू कितीही मोदींवर टिका टिप्पणी केली तरी त्यांचा निस्वार्थ सेवाभावाचा भरलेला झोला आहे. निर क्षीर विवेक बुद्धी ने परखायचा परिपुर्ण झोला आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याचा परिपक्व झोला आहे. देशाला विश्वगुरुपदी विराजमान करण्याचा मानस आणि त्यादिशेने कार्यरत भरलेला झोला आहे. दोन खोल्यांच्या स्वतः च्या घरात समाधानाचा झोला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी भरलेला स्वाभिमानाचा झोला आहे. असा “झोला” मामु तुझ्या विचारापलिकडला आहे. आणि मोदी जे म्हणतात कि झोला लेके निकल जाउंगा ह्याचा अर्थ असा की हा भरलेला झोला. “राष्ट्राय स्वाहा – इदं न ममं” राष्ट्राला अर्पण करून, जनकल्याणाचे आशिर्वाद लाभलेला झोला घेऊन निघून जाईन. पण दोन पक्षांच्या सुया टोचून घेतल्यावर “झोला” शब्दावर बेरकी शब्दकोटी करण्यापलीकडे, मामु तुझी दृष्टी पण नाही आणि कल्पना भरारीत शक्ती पण नाही.
ज्या मामु ला संतांचे कार्य काय माहिती नाही म्हणून योगी आदित्यनाथ वर ताशेरे ओढतो की संन्यासी आहे तर मग “राज्याची आसक्ती” कशासाठी? मामु सर्व जगाला सुधरवण्याचे महान कार्य संतांचे आहे. त्यासाठी तो कधी पंतप्रधान पदी बसतो आणि जगाला सत्याची ताकद दाखवितो, तर जगाला मार्गदर्शक असतो. तर कधी उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री पदी विराजमान नीर क्षीर विवेक बुद्धी ने दुष्ट शक्तींचे निर्दालन करतो. तुझ्यासारख्या झोला दरिद्री मुख्यमंत्र्याला सुद्धा सन्मार्गाचा रस्ता दाखविण्याची ताकद संत आणि योग्यांमध्ये असते. पण त्यांचे सानिध्य मिळायला पुर्व संचित लागते. कर्मदरिद्री झोलाबाज मुख्यमंत्र्यांच्या नशिबात कदाचित असे सानिध्य नसते. अशांचे मालक भरसभेत अशा रखेलीचा हात धरतात, वर करतात आणि सांगतात आता ही आपली मुख्यमंत्री पदाची पट्टराणी.

भाई देवघरे

Leave a Reply