भगवान बुद्धाने विचारांच्या मार्गानेच सर्वांवर विजय मिळविला – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १५ ऑक्टोबर – तलवारीने कोणीही विजय मिळवू शकतो. पण विचाराने विजय मिळवणे हे कठिणच आहे. भगवान बुद्धाने विचारांच्या मार्गानेच सर्वांवर विजय मिळविला, असं सांगतानाच बुद्धिस्ट थीम पार्कचा प्रकल्प या ठिकाणी सुद्धा निश्चित होईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे धम्म चक्रपरिवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. ड्रॅगन पॅलेस हे प्रत्येकाला मन:शांती देणारे ठिकाण आहे. ड्रॅगन पॅलेसमध्ये अनेक उपक्रम सुरू आहे. सुलेखा कुंभारे यांनी हे कार्यक्रम घडवून आणले आहेत. त्यामुळेच त्यांच्यासोबत आमचं नावही चालत राहील, असं सांगतानाच बुद्धिष्ट थीम पार्कचा प्रकल्प सुद्धा या ठिकाणी निश्चित होईल याची ग्वाही देतो, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. बुद्धांचा संदेश हा जागाच कल्याण करणारा आहे. जगातील जटिल प्रश्न सुद्धा बुद्धाच्या विचाराने सुटू शकतात. बुध्दाशी संबंधित असलेल्या सगळ्या ठिकाणांना जुळणारे रस्ते बांधण्याची संधी मला मिळाली. या बुद्ध सर्किटच लवकरच पंतप्रधान यांच्या हस्ते उदघाटन होईल, असं नितीन गडकरी म्हणाले.

Leave a Reply