स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आजच्या काळात देशात योग्य माहितीचा मोठा अभाव – सरसंघचालक मोहन भागवत

नवी दिल्ली : १३ ऑक्टोबर – स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गंभीर आरोप केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आजच्या काळात देशात योग्य माहितीचा मोठा अभाव आहे. ही एक समस्या आहे. सावरकरांबद्दल लिहिलेल्या तीन पुस्तकांमधून बरीच माहिती मिळू शकते. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच वीर सावरकरांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली होती. आता यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद यांना बदनाम करण्याचा घाट घातला जाईल. कारण सावरकर या तिघांच्या विचारांनी प्रभावित झाले होते, असं मोहन भागवत म्हणाले.
सावरकरांचे हिंदुत्व, विवेकानंदांचे हिंदुत्व म्हणण्याची सध्या फॅशन आली आहे. पण हिंदुत्व एक आहे, ते आधीही होते आणि शेवटपर्यंत राहणार. सावरकरांना परिस्थिती पाहून हिंदुत्व अधिक ठळपणे मांडण्याची आवश्यकता वाटली. जे भारताचे आहे, त्याची सुरक्षा आणि प्रतिष्ठा भारताशीच संबंधित आहे. सावरकरांची ठरवून बदनामी केली गेली. कारण खरं लक्ष्य होतं भारताचा राष्ट्रवाद. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना पाकिस्तानातही प्रतिष्ठा मिळाली नाही. यामुळे जो भारताचा आहे, तो भारताचाच आहे, असं ते म्हणाले.
आपली पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. पण पूर्वज एकच आहेत. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्यांना तेथे प्रतिष्ठा मिळाली नाही. हिंदुत्व एक आहे आणि तो शाश्वत आहे. आता ७५ वर्षांनंतरही हिंदुत्वाबद्दल मोठ्याने बोलण्याची गरज आहे. कुणाचे लांगूलचालन व्हायला नको, असं सावकरांनी म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply