जीवे मारण्याची धमकी देऊन दिराने केला वाहिनीवर अत्याचार

नागपूर : १३ ऑक्टोबर – शहरातील हिंगणा पोलिस ठाणे हद्दीत दिराकडून वहिनीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दिरावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिराने अत्याचार केल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी माहितीनुसार, पीडितेच्या पतीवर फौजदारी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, पोलिस ठाण्यात येताच तो पोलिसांची नजर चुकवून पसार झाला होता. या घटनेनंतर दोन पोलिस कर्मचार्यांना देखील निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, पती हा पसार असल्यानंर पीडिता व आरोपी हे एकाच घरी राहायचे. ४ ऑक्टोबर रोजी पीडिता ही घरी एकटी असल्याचे बघून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपीने पीडितेने यासंदर्भात कुठेही बतावणी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या धमकीला घाबरून पीडिता शांत होती. दरम्यान, आरोपीने ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा तिच्यावर बळजबरी केली. पीडितेने विरोध केला असता मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी पीडितेने या प्रकरणी हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३५४ अ, ५0६ (२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply