राज्यात २२ ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी

मुंबई : १२ ऑक्टोबर – कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल आणि मंदिरं सुरू करण्यात आली आहे. पण, अजूनही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास नियम लागू होते. मात्र, आता २२ ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घेता येणार आहे.
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे टप्प्या-टप्प्याने सर्व लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आता बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना २२ ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सभागृह आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद होते. त्यामुळे आता राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे. बंदिस्त सभागृह ५० टक्के क्षमतेनं कार्यक्रम घेता येईल.
कार्यक्रम घेत असताना कोविडच्या नियमांचं पालन करावे लागणार आहे. ज्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्या सभागृहातील एसी २४ ते ३० अंश सेल्सिअस मर्यादित असली पाहिजे.
जर मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असेल तर दोन व्यक्तीमधील अंतर सहा फूट असावे, असं नियम घालून देण्यात आले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांचे दोन्ही लशीचे डोस होणं महत्वाचे आहे.
राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे आता कलाकारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Leave a Reply