प्रियांका गांधींना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे – आशिष देशमुख यांची मागणी

नागपूर : ९ ऑक्टोबर – नेहमी आपल्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी परत एकदा एक राजकीय बॉम्ब टाकला आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशी मागणीच देशमुख यांनी केली आहे. यासाठी एआयसीसीच्या सदस्यांना पत्र लिहणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं.
काँग्रेसमध्ये बढती मिळाल्यापासून आशिष देशमुख चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. अलीकडेच आशिष देशमुख यांची आता त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी कुणाची निवड करावी, याबद्दल नवीन मागणी केली आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. मात्र राहुल गांधी यांना काही कारणास्थ राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं नसेल तर प्रियांका गांधी यांनी हे पद स्वीकारावे, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.
तर, नागपूर जिल्हापरिषद निवडणूक प्रचारात 25 सप्टेंबर रोजी आशिष देशमुख यांनी सावरगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी हजर होते. देशमुख यांनी आपल्याच निवास्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले होते. काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात केलेल्या या प्रचाराबद्दल मात्र देशमुख यांनी बोलायला नकार दिला.
विशेष म्हणजे, काही दिवसा आधीच आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर बँकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोपही केले होते. या आरोपानंतर काँग्रेसकडून मनधरणी करत त्यांना काँग्रेस कमिटीवर घेण्यात आले आहे. त्यानंतर आता देशमुख यांनी नव्यानेच मागणी केली आहे.

Leave a Reply