नागपूरच्या चितारओळीत पहाटे सिलिंडरच्या स्फोटाने लागली आग, तीन जखमी, घराचे प्रचंड नुकसान

नागपूर : ९ ऑक्टोबर – नागपूरच्या चितार ओळमधील गजानन बिंड यांच्या घरी सकाळी ५.३० वाजता अचानकपणे स्फोट झाला. यामध्ये बिंड यांच्या घरातील तीन सदस्य किरकोळ जखमी झाले. या मध्ये घरातील हॉल, स्वयंपाक घर, बेडरूमचे मोठे नुकसान झाले. हा स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकलेले नसले तरी सिलिंडर लीक झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चितार ओळमधील गजानन बिंड यांच्या घरात पहाटे अचानकपणे स्फोट झाला. स्फोट कशामुळे झाला हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार घरातील इलेक्ट्रिक बटन सुरू केल्यानंतर हा स्फोट झाला. स्फोट अचानकपणे झाल्यामुळे घरातील तीन सदस्य जखमी झाले. ही घटना घडल्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच परिसरातील नागरिकांनी बचावकार्य करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाचा गाड्यादेखील तेथे पोहोचल्या. या घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या श्वानपथक, विधुत प्रवाह पथक आणि घरगुती गॅस सिलिंडर पथकाद्वारे या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. हा स्फोट इतका मोठा होता की घरामागील भिंत कोसळली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चितारओळी हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. स्फोट झाल्यानंतर आग नियंत्रणात आली नसती तर मोठी दुर्घटना या ठिकाणी झाली असती, असे येथील कोकांकडून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply