वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पितृभक्त आर्यन !

असं म्हणतात, बापाच्या इच्छा
मुलाने पुऱ्या कराव्या ,
त्या पूर्ण झाल्या कि बापाला मुक्ती मिळते !
तुम्ही काही म्हणा पण अर्धा हिंदू असल्यामुळे,
आर्यनलाही हे नक्कीच कळते !
म्हणून तर शाहरुखने प्रगट केलेल्या
काही इच्छा त्याने पूर्ण केल्या !
त्याच्या या पितृभक्तीची
आपण सगळ्यांनी दाद द्यायलाच पाहिजे !
किमान त्यासाठी तरी आपण त्याची तारीफ करायलाच पाहिजे !
शाहरुखने आणखीही काही इच्छा व्यक्त केल्या होत्या, जसं कि,
मुलीची छेडखानी करणे वगैरे वगैरे !
त्याच्या त्याही इच्छा आर्यन लवकरच पूर्ण करो अश्या शुभेच्छा आपण आर्यनला द्यायला पाहिजे !
इतक्या उदात्त इच्छा !इतके उत्तम विचार ! इतके सुंदर संस्कार !
ज्या मुलावर होतील , तो,
नक्कीच पुढे ‘ खान’दानाचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही !
‘ खाण तशी माती म्हणतात ‘ ते उगाच नाही !
शाहरुखलाही आपण काही उगाच डोक्यावर घेतलं नाही !
उगाच त्याला आपले रोल मॉडेल
बनवले नाही !
अशा या आपल्या रोल मॉडेलला
आता तरी मुक्ती द्याल कि नाही !

         कवी -- अनिल शेंडे 

Leave a Reply