यशोमती ठाकूर यांचा उपमुख्यामंत्री आणि गृहमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप

अमरावती : ५ ऑक्टोबर – राज्यभरात जिल्हा बँका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढण्याची चर्चा करत आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईमुळे काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट उपमुख्यंत्री आणि गृहमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केला आहे.
अमरावतीच्या जिल्हा बँक निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबलं आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले.
त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी स्वतः गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशनला घेराव केला आणि गाडगेनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यावर कारवाईची मागणी करत कार्यकर्त्यांवर कोणाच्या दबावापोटी गुन्हे दाखल करत असाल तर खबरदार हे खपवून गेल्या जाणार नाही,असे संजय खोडके यांचे नाव घेता सांगितलं.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कार्यालयामध्ये बसून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. या कार्यालयांचा पुरेपूर वापर केला जात आहे. त्या कार्यालयाच्या दुरुपयोगामध्ये पोलिसांचा देखील वापर होत असतो. दोन्ही कार्यालयात बसून इथल्या पीआयएवर दबाव टाकतोय, इथल्या लोकांवर दादागिरी करतोय. आमच्या कार्यकर्त्यांना उचललं जातं, त्यांच्यावर 353 नुसार कारवाई केली जाते, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

Leave a Reply