मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनावर अधिराज्य करणारी स्थिती आजची बदलेली जीवनशैली

आज आपण समाजात पाहतो जो तो पैशाच्या मागे धावत चालला आहे. पूर्वीच्या काळी मुलांना आपल्या वडिलांसमोर उभे राहायचे हिंमत नव्हती. कुटुंब मोठे होते त्यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नव्हत्या. स्वस्ताई होती परंतु पैसा नव्हता. काही गोष्ट वडिलांना मागायची तर आठ दिवस आधी आईच्या मार्फत मागावी लागायची. पण ती मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती.
आज परिस्थिती खूप बदलली आहे. आजची पिढी ही खूप बिनधास्त आहे. बरोबर आहे नवीन नवीन तंत्र बाजारात उपलब्ध झाले आहे. आज विज्ञानाने नवीन नवीन तंत्र विकसित केले आहे एकविसाव्या शतकात विज्ञान हा माणसाचा एक अविभाज्य घटक समजला जातो. विज्ञानाशीवाय जगणे अशक्य आहे. जीवनाचा प्रत्येक घटक हा मानवी स्वभावाशी जोडला आहे.
आज विविध उपकरणे विकसित झाली आहे जसे टीव्ही मोबाईल, कॉम्प्युटर याद्वारे आपण जगात कोणाशीही संपर्क साधू शकतो. जगात चाललेल्या घडामोडी आपण जाणून घेऊ शकतो. विज्ञानामुळे जीवघेण्या आजारांवर इलाज केला जाऊ शकतो. विज्ञानामुळे आपण जगभराचा प्रवास सहजपणे करू शकतो. या माध्यमातून माणूस चंद्रावर पोहोचला. विज्ञानाचा खूपसा उपयोग आपण बघतो जसे अन्नावर प्रक्रिया करून ज्यामुळे उपासमार बंद झाली विविध बियाणाचा शोध लावला त्यामुळे शेतीमध्ये त्याचा उपयोग होऊ लागला. हे सगळे विज्ञानाशिवाय अशक्य. आज विज्ञानाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.
हे सर्व जसे फायद्याचे आहे त्याचप्रमाणे अनर्थ करण्याची ताकदही विज्ञानाने दिली ना. विज्ञानामुळे बॉम्ब बनवण्याची ताकद दिली की ज्याने मानवी जाती नष्ट होईल. आज इंटरनेट सारख्या माध्यमाचा शोध लागला. ज्यामुळे मानवी बुद्धीचा विकास होऊ लागला. पण मानव हा इंटरनेटच्या चुकीच्या मार्गाने उपयोग करू लागला. विज्ञान ज्याप्रमाणे प्रगती करत गेला त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ह्यास पण होऊ लागला.
विज्ञानाची जशी प्रगती झाली तशीच मानवाची भूक पण वाढत गेली. त्याने झाडे तोडली. त्याचा उपयोग त्याने घरे बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने प्राण्यांचा जीव घेतला. पर्यावरणाचा ह्यास झाला. ज्याप्रमाणे विज्ञानाच्या फायदा जगाला झाला त्याचप्रमाणे त्याचा तोटापण झाला. हे सगळं बघून मनाला एक प्रकारची धास्ती लागली. एक विचार मनात आला ‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’.
आज विज्ञान आपल्या हरेक गरजा पूर्ण करते. विज्ञान म्हणजे मानवाला लाभलेला एक हिरा. त्याचे मोल कधीच मोजता येणार नाही. फक्त त्याचा उपयोग प्रत्येकाने चुकीच्या मार्गाने न करता चांगल्या मार्गाने करावा. जगात जे ज्ञान आहे ते जादूची कांडी फिरवावी तसे ते विज्ञानाने दूर केले आहे.
चाकाच्या माध्यमातून मानवी जीवनाला गती मिळाली. मानवाच्या प्रत्येक गरजा विज्ञानाने पूर्ण केल्या. आज आपण घरात पाहतो पूर्वी जात्यावर दळण दळले जाते त्याची जागा पीठ गिरणीने घेतली. पूर्वी धोपटण्याने कपडे धुतले जात त्याची जागा वाशिंग मशीनने घेतली. याचबरोबर पीठ मळण्याची मशीन, मिक्सर असे अनेक उपकरणे विज्ञानाने दिली. मानवाच्या जीवनाला स्थैर्य मिळाले. अनेक कठीण काम झाले. संगणकाच्या माध्यमातून एका क्लिक वरून आपल्याला जगभरातील माहिती मिळते. आपल्याला आपल्या कल्पनांची देवाणघेवाण करता येते. आरोग्य, शिक्षण, औद्योगीकरण अशा विविध क्षेत्रात विलक्षण क्रांती घडवून आणली. अंधश्रद्धेपासून वगळलेला नवीन समाज निर्माण झाला.
या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, विज्ञानाने शोधलेल्या यंत्राचा फायदा जसा झाला तसेच कष्टाचे महत्त्व नाहीसे झाले आहे. तो आळशी झाला आहे. खेळ ते स्वयंपाक पर्यंत जरी यंत्र दिले तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यासाठी आवश्यक व्यायाम आपण हरवून बसलो. ह्यात आपण आपली माणुसकीच हरवून बसलो या ह्या सगळ्या तंत्राचा छळ प्रदूषण रुपी महाभयंकर राक्षसात केले. वनांची नासधूस करून निसर्गाचा समतोल नष्ट केला. आपल्या संरक्षणासाठी लाभलेल्या अणुशक्तीचा उपयोग युद्धात केला. लहान-सहान कारणांसाठी नैसर्गिक रित्या ऊर्जेचा अपव्यय करण्यात आला. ज्यात सोनोग्राफी च्या साह्याने रोगांवर नियंत्रण मिळवता आले त्याच्या साह्याने स्त्रीभ्रूण हत्याच अमानुष कृत्य करण्यात आल.
याला कारण मानवाची बदललेली मानसिकता हिंसक प्रवृत्ती व स्वार्थ पणा कारणीभूत होय. ह्यात आपल्याला विज्ञानाने भरपूर साथ दिली व ती देत राहणार. पण मानवाने फक्त चांगल्या गोष्टी साठी त्याचा उपयोग करावा असं मला मनापासून वाटतं.
या लेखातून मानवी स्वभावाला एक नवा मार्ग मिळावा हीच माझी इच्छा आहे

पल्लवी उधोजी

Leave a Reply