नागपुरात कचरा वेचणाऱ्या तरुणाची हत्या

नागपूर : ५ ऑक्टोबर – नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून हत्यांचं सत्र सुरुच आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची घटना उघडकीस आली आहे. कचरा वेचक तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुंभारपुरा भागात एका युवकाचा खून करण्यात आला. मृत तरुण हा कचरा वेचक असून त्याला आरोपीने गट्टूनी मारले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही
हत्येनंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. कचरा वेचक तरुणाची हत्या नेमकी कोणी आणि का केली, आरोपी कोण आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply