लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : ४ ऑक्टोबर – लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने प्रेयसीसोबत वेळोवेळी अत्याचार केला. प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला. आरोपीचे अन्य दुसरीकडे लग्न जुळल्याचे कळल्यानंतर प्रेयसीने आपल्या प्रियकराविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोहेल शेख मोहम्मद शेख (वय २८ वर्ष) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
नंदनवन हद्दीत राहणारी (वय २७ वर्ष) पीडितेचा आरोपी सोहेल शेख मोहम्मद शेख यांची सोशल मीडिया अँपच्या माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली. यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर आपापली आयडी एकमेकांना शेअर केली. मैत्री पुढे सरकली आणि फोनवर संवाद सुरू झाला. वर्ष २0१९ मध्ये हे दोघेही एकमेकांना लॉ कॉलेज चौकातील एका कॅफे हाऊसमध्ये प्रत्यक्ष भेटले. या नंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि मित्रत्वाचे संबंध प्रेमात बदलले. दरम्यान, याच वर्षी हे दोघेही एका कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. यावेळी, आरोपीने पीडितेला शरीरसुखाची मागणी केली. यावेळी आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यामुळे, पीडिता तयार झाली. यानंतर ते दोघेही नागपूरला परतले. दरम्यान, त्यांनी रामटेक, खिंडसी आदी ठिकाणी आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. वर्ष २0२0 मध्ये पीडिता ही गर्भवती राहिली. यावेळी, आरोपीने पीडितेला गर्भपाताचे औषध दिले आणि गर्भपात केला. यामुळे पीडितेची प्रकृती खालावल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. ती बरी झाल्यानंतर आरोपीने २0२१ मध्ये व्यंकटेशनगर येथे तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. दरम्यान, आरोपीचे लग्न हे आधीच अन्य मुलीशी जुळल्याचे पीडितेला कळल्यानंतर तिने यासंदर्भात विचारणा केली. यानंतर आरोपीने तिचे फोन उचलणे बंद केले आणि तिला ब्लॉक केल्याचे पोलिसांनी सांगितले. परिणामी, पीडितेने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave a Reply