बुलडाणा : २ ऑक्टोबर – महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती तसेच बुलडाणाचे राधेश्याम चांडक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सायकलपटू संजय मयुरे आज २ आक्टोबर रोजी साहसी मोहीमेच्या अंतर्गत फिट इंडिया,सायकल चालवा,सायकल दान करा, पर्यावरण व पर्यटन चा प्रसार व प्रचार करण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी या ४१०० कि.मी. सायकल प्रवास सुरु केला आहे. जयस्तंभ चौक येथून राधेश्याम चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे, नितीन घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ८ वाजता त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली आहे.
बुलडाणा – भुसावळ – जम्मु – श्रीनगर- असा सायकल, रेल्वे, बस द्वारे श्रीनगर ला दिनांक ५ आक्टोबर रोजी पोहोचणार असून दिनांक ७ अक्टोबर रोजी लाल चौक श्रीनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात करणार असून जम्मु, पठाणकोट, अमृतसर, जालंधर,पतीयाला, पानिपत नवी दिल्ली, आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, नागपूर, हैदराबाद, बंगलोर मार्ग कन्याकुमारी ला दि.१७ नोव्हेंबर रोजी पोहोचणार आहे.
संजय मयुरे यांनी यापूर्वी देश विदेशात बरेच सायकल प्रवास केले असून नुकतेच जानेवारी ते मार्च २१ या काळात नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे.