चंद्रपूरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची पुण्यातून सुटका

चंद्रपूर : २ ऑक्टोबर – स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा तालुक्यातील तीन अल्पवयीन अपहृत मुलींची पुणे येथून केली सुटका केली असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. २७/0९/२0२१ रोजी वरोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली तिच्या मैत्रिणींचा वाढदिवस असल्याचे घरून निघून गेल्या होत्या. मुली सायंकाळपयर्ंत घरी परत न आल्याने मुलींच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी मुलींचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, मुलींचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे मुलींच्या नातेवाईकांनी पो.स्टे. वरोरा येथे दि. २८ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध मुलींना फूस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरू केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तत्काळ सदर गुन्ह्य़ाचा छडा लावण्याकरिता सूचना दिल्या.
पोलिस निरीक्षक खाडे यांनी तत्काळ स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे यांचे नेतृत्वात चार पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली. मिळालेल्या माहितीवरून सदर मुलींच्या संपर्कात यवतमाळ जिल्ह्य़ातील राळेगाव येथील काही मुले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून स्था.गु.शा.चंद्रपरची तीन पथके तत्काळ राळेगाव येथे तपासकामी रवाना झाले. त्या ठिकाणी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पो.स्टे.बाबूळगाव, जि.यवतमाळ हद्दीतील एका मुलगी अज्ञात इसमाद्वारे अपहरण केल्याबाबत दि. २७/0९/२0२१ रोजी अप.क्र. ४१७/२0२१ कलम ३६३ भादंवि अन्वये नोंद असल्याचे समजले. पो.स्टे.वरोरा हद्दीतील व पो.स्टे.बाबूळगाव जि.यवतमाळ हद्दीतील मुलींचे एकाच वेळी घडलेल्या अपहरण झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. पथकातील अधिकार्यांनी अधिकची माहिती घेतली असता दि.२९/0९/२0२१ रोजी रेल्वे स्टेशन वर्धा जंक्शन येथे दिसून आल्याबाबत माहिती प्राप्त झाली. वरील नमूद गुन्ह्य़ातील पीडित मुली व त्यांना घेऊन जाणारे मुले हे रांजनगाव जि.पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुणेकरिता पथक रवाना झाले. तेथे पुणे पोलिसांच्या मदतीने सापळा रचून कारवाई करीत नमूद गुन्ह्य़ातील तीन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व त्यांच्यासोबत ४ संशयित मुले नामे रोहित गोपाल संगीले (वय २0), शुभम संजय मानेकर (वय २२), प्रमोद मोतीबाबा सोनवने (वय २२), प्रक्षिक विलास भोयर (वय २३) सर्व रा.राळेगाव जि.यवतमाळ हे सापडून आल्याने सर्वांना ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे आणण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कालकर्णी यांच्या मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे, स.पो.नि जितेंद्र बोबडे, संदीप कापडे आदींनी केली.

Leave a Reply