राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर

नागपूर : ३० सप्टेंबर – निवासी डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षण खात्याने दिलेल्या शैक्षणिक शुल्कमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे निवासी डॉक्टरांची मध्यवर्ती संघटना असलेल्या मार्डने राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये येत्या १ ऑक्टोबरपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
निवासी डॉक्टरांचा तीन वर्षांचा एमडी पदव्युत्तर अभ्यासक्रम २0 महिने कोरोना रुग्णांची सेवा करण्यात लोटला. त्यामुळे विविध विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आलेल्या निवासी डॉक्टर केवळ कोरोना हाताळत आहेत. कोरोनाच्या या लढाईत या योद्धय़ांचे शैक्षणिक नुकसान झाले. दुसरीकडे शुल्कमाफीचे दिलेले आश्वासन पाळत नाही. याच कारणावरून उद्यापासून मार्डच्या डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Leave a Reply