मित्राच्या आईला वाचवायचा नादात युवकाचा अपघातात मृत्यू , दोघे जखमी

यवतमाळ : ३० सप्टेंबर – विष प्राशन केलेल्या मित्राच्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात देवानंदने आपला जीव गमावल्याची घटना दुपारी ३ च्या दरम्यान घडली. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील माहूरकडून सर्विस रोडने येणार्या दुचाकीने एसटी बसला मागून धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. देवानंद रामकृष्ण मंगाम (वय २५ रा. अमराईपुरा, आर्णी) असे मृतक युवकाचे नाव आहे. तर शेख अमान शेख मेहबूब (वय २२) त्याची आई रजिया शेख महेबूब (वय ४५) दोघेही रा. झोपडपट्टी हे जखमी झाले आहेत.
रजिया महेबूब शेख हिने आपल्या सुकळी येथील शेतात विषारी औषध प्राशन केले होते. ही माहिती त्यांचा मुलगा शेख अमान याला मिळताच त्याने आपला मित्र देवानंद मंगाम याच्यासह सुकळी येथील शेतात जाऊन आपल्या आईला दुचाकीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात आणत होता. परंतु नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दिग‘स रोडवरील आर्णीकडे येणार्या उडाण पुलाजवळ एसटी बस क‘मांक एमएच४० वाय५३३६ ही एसटी माहूरहून आर्णीमार्गे यवतमाळला जात होती. तिला मागून भरधाव येणाऱ्या दुचाकी पॅशन क‘. एमएच२९ डब्लू३१५० ने बसला मागून धडक दिली.
यामध्ये दुचाकी चालवणारा देवानंद रामकृष्ण मंगाम यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी पाठवले. तर विष प्राशन केलेल्या महिलेला यवतमाळला उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.

Leave a Reply