ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी गर्भवती महिलेचा गळा आवळून खून

भंडारा : २९ सप्टेंबर – पैशांवरून सासर आणि माहेरमध्ये झालेले वाद तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. यातून अनेकदा गंभीर गुन्हेही घडले आहेत. असाच एक प्रकार भंडाऱ्यामध्ये समोर आला आहे. भंडाऱ्यात ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी गर्भवती सुनेचा गळा आवळून खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.
जिल्ह्यातल्या लाखांदुर तालुक्यातिल चप्राड येथे घडली आहे. भावाच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी गुन्हा नोंद करत पती, दीर व सासुला अटक केली आहे. रंजना होमराज बघमारे वय २५ वर्ष असे मृतक सुनेचे नाव असून या प्रकरणी पती होमराज बघमारे वय २८ वर्ष, सासू प्रमिला बघमारे वय ५५ वर्ष व दीर संजय बघमारे वय २६ वर्ष राहणार चप्राड यांना अटक करण्यात आली आहे.
लाखांदुर तालुक्यातिल डाभेविरली येथील रंजनाचा विवाह गत मार्च महिन्यात चप्राड येथील होमराज बघमारे याच्यासोबात झाला होता. सुरुवातीला दोन महिने सुखात गेले. मात्र, त्यानंतर सासरच्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख रुपये आणण्यासाठी रंजनाला गळ घातली. रंजनाने असमर्थता दाखवताच तिचा छळ सुरू झाला.
दरम्यान, घटनेच्या दिवशी गर्भावती रंजनाला बेदम मारहाण करून साडीने तिचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी भाऊ सोमेश्वर बुराडे ह्यांच्या तक्रारी वरुण पती, सासू व दीर याच्याविरुद्ध कलम ३०४,३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. तर घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Leave a Reply