नागपूर : २८ सप्टेंबर – माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांचे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास नागपूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते. त्या ९६ वर्षाच्या होत्या. त्यांनी सोमवारपासून उपचारास प्रतिसाद देने बंद केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा शरद बोबडे, सून रंजना बोबडे नातवंडे आणि नातेवाईक आणि मित्रमंडळी असा आप्तपरिवार आहे.
माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मातृशोक
- Post author:Panchnama
- Post published:September 28, 2021
- Post category:नागपूर
- Post comments:0 Comments