चंद्रपूर जिल्‍ह्यामधील पारंपारिक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचा एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबत सहयोग

नागपूर : २७ सप्टेंबर – अंबुजा सिमेंट फाऊंडेशन (एसीएफ) या अंबुजा सिमेंट्स लिमिटेडच्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) शाखेने एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबत सहयोगाने महाराष्‍ट्राचा दुष्‍काळग्रस्‍त चंद्रपूर जिल्‍हा व राजस्‍थानचा पाली जिल्‍हा येथे पारंपारिक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी उपक्रम हाती घेतले आहेत.
दोन्‍ही जिल्‍ह्यांच्‍या ५० गावांमधील समुदाय तलावांची साफसफाई केल्‍याने १६६ दशलक्ष लिटर अतिरिक्‍त पाणी साठा क्षमता निर्माण होण्‍याची खात्री मिळेल.
या प्रयत्‍नाला स्‍थानिक समुदायांनी उत्‍स्‍फूर्तपणे प्रतिसाद दिला,ज्‍याअंतर्गत साफसफाई करण्‍याची गरज असलेल्‍या जलाशयांची निवड ते संपूर्ण सुधारणा करण्‍याच्‍या प्रक्रियेवरील देखरेखीपर्यंत त्‍यांनी मदत केली. तसेच प्रकल्‍पाचा ७५ टक्‍के खर्च स्‍थानिक समुदायांनी केला असून काहीजणांनी तलावांची साफसफाई करण्‍यासाठी उत्‍खनन मशिन्‍स व ट्रॅक्‍टर्सचा पुरवठा केला आहे आणि विविध ग्रामीण विकास कार्यांसाठी आसपासच्‍या भागांमध्‍ये गाळ नेण्‍यात आला आहे.
एकूण, चंद्रपूरमधून २४,००० घनमीटर गाळ काढण्‍यात आला आणि पालीमधून १,४२,००० घनमीटर गाळ काढण्‍यात आला, ज्‍यामध्‍ये ९ ग्रामपंचायतींमधील १७ तलावांमधील गाळ साफ करण्‍यात आला.
अंबुजा सिमेंट्स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी नीरज अखौरी म्‍हणाले,”पृथ्‍वीवर मानवी जीवन टिकण्‍यासाठी पाणी ही सर्वात महत्त्वपूर्ण गरज आहे. अंबुजा सिमेंट्स लिमिटेडमध्‍ये आम्‍ही ग्रामीण समुदायांना हा बहुमूल्‍य स्रोत उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेण्‍यावर लक्षणीय भर देतो. भारतभरातील दुष्‍काळग्रस्‍त प्रदेशांमधील अशा प्रकारच्‍या उपक्रमांमधून स्‍थानिक समुदायांना मुलभूत गरजांसह साह्य करण्‍याचे आमचे स्थिर प्रयत्‍न दिसून येतात.”
साफसफाई करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमधून आसपासच्‍या भागांतील ५५० ट्युबवेल्‍समधील पाण्‍याच्‍या पातळ्या वाढल्‍या असल्‍या तरी काढण्‍यात आलेला गाळ मातीमधील ओलावा वाढवण्‍यामध्‍ये, तसेच पीकाची उत्‍पादकता वाढवण्‍यामध्‍ये अत्‍यंत लाभदायी असल्‍याचे मानले जाते.
अंबुजा सिमेंट फाऊंडेशनच्‍या संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पर्ल तिवारी म्‍हणाल्‍या,”एसीएफ नवोन्‍मेष्‍कारी दृष्टिकोनाचा अवलंब करते आणि समुदायांमध्‍ये पाण्‍याचे जतन करण्‍यासोबत पाण्‍याच्‍या पातळ्या वाढवण्‍यासाठी पारंपारिक ज्ञानाचा वापर करते. एटीई चंद्रा फाऊंडेशनसोबतचे आमचे कार्य शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नांवर अनेक अनुकूल परिणाम निर्माण करेल आणि भूजल पातळी वाढवण्‍याची देखील खात्री घेईल.”
एटीई चंद्रा फाऊंडेशन व्‍यतिरिक्‍त केअरिंग फ्रेण्‍ड्स, सज्‍जन इंडस्‍ट्रीज आणि अविनाश (इंदिरा फाऊंडेशन) यांसारख्‍या इतर संस्‍थांनी देखील राब्रियावास व चंद्रपूरमधील अनेक जलाशय पुन्‍हा सुरू करण्‍यासाठी सहयोग केला आहे.
मेघाराम, जयतरन प्रधान पुढे म्‍हणाले,”एसीएफ मागील १८ वर्षांपासून आमच्‍या भागांमध्‍ये पाणी जतन करण्‍यासंदर्भात काम करत आली आहे. समविचारी संस्‍था व समुदायामधील सदस्‍यांच्‍या या संयुक्‍त सहयोगाने आम्‍हाला भागामध्‍ये अनुकूल परिणाम निर्माण करण्‍यास मदत केली आहे आणि त्‍यांच्‍या प्रयत्‍नांचा स्‍थानिक समुदायांना देखील फायदा झाला आहे.”
वर्ष २००० च्‍या सुरूवातीपासून एसीएफने दुष्‍कानग्रस्‍त भागांमध्‍ये नवीन जलाशय निर्माण करण्‍याऐवजी अस्तित्त्वात असलेल्‍या जलाशयांची दुरूस्‍ती व देखरेखीला प्राधान्‍य दिले आहे. हा दृष्टिकोन आर्थिकदृष्‍ट्या लाभदायी आहे, कारण यामुळे नवीन जलाशय निर्माण होण्‍यासाठी लागणारा खर्च, तसेच जमिन व मजूरकामाची बचत होते. अशा निर्माणांच्‍या सातत्‍यपूर्ण देखरेखीमधून जलाशयांची साफसफाई करण्‍याची, तसेच लीकेजेस् दुरूस्‍त करण्‍याची काळजी घेतली जाते.
पारंपारिक जल संचयन यंत्रणा पुन्‍हा सुरू झाल्‍याने ग्रामीण भारतामध्‍ये पाणी उपलब्‍धतेचे कार्यक्षमपणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते. समविचारी सहयोगी व समुदायांसोबत परिश्रमपूर्वक काम आणि बंद झालेले पाण्‍याचे साठे ओळखून दुरूस्‍त करण्‍यासाठी लोकांच्‍या संस्‍था निर्माण करत या ग्रामीण समुदायांसाठी जल सुरक्षितता स्थिर पद्धतीने संपादित करता येऊ शकते.

Leave a Reply