वर्धा : २७ सप्टेंबर – तळेगाव (शा. पंत) येथील हायवे नंबर ६ च्या बाजूने ई कॉम एक्सप्रेस कुरिअर ऑफिसमध्ये मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान अज्ञात चोरांनी ऑफिसचे शटर तोडून २ लाख ५१ हजार ८९ रुपये लंपास केले. हे ऑफिस चार वर्षापासून तळेगाव येथे किरायाने घेतलेले आहे त्या ऑफिसमध्ये संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने आलेले साहित्याची विक्री करतात पण अज्ञात चोराने त्यावर आपला डाव साधून रोख रक्कम लंपास केली ही माहिती तळेगाव पोलीस डी वाय एस पी सुनील साळुंखे यांना मिळताच घटनास्थळी पोहचून घटना पंचनामा करण्यासाठी स्वतः तळेगावचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी घटना स्थळी येऊन पाहणी केली. पुढील अज्ञात चोराचा तपास तळेगाव पोलिस करीत आहे
कुरियरच्या ऑफिसचे शटर तोडून २ लाख ५१ हजाराची रोकड लंपास
- Post author:Panchnama
- Post published:September 27, 2021
- Post category:विदर्भ
- Post comments:0 Comments