वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

झाले पुरते हिरवे तरीही म्हणवुन घेती भगवे
धडपड त्यांची केविलवाणी लोकांना ना बघवे ।।

नित्य चालते धुसफुस त्यांची आणिक तंगडओढी
सुंदुपसुंदी रोज चालते आणिक ठोकाठोकी ।।

एक दुज्यावर गुरगुरती अन पंजेही मारती
ओरबाडती ,रक्त काढती आरती ओवाळती ।।

दादा,नाना,काका,मामु सारे भरले टगे
रयाच गेली त्यांची झाले टाचणलेले फुगे ।।

तेच संगती निजशत्रूला लफडी एक दुज्यांची
आणि म्हणती कारवाई ही आहे सुडबुद्धीची।।

तत्वही नाही ,विचार नाही जुळे न काही त्यांचे
सत्तेचे ते सिमेंट केवळ जोडी सांधे त्यांचे ।।

         कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply