अरे, कुठे नेवून ठेवलाय ..!
आपल्या महाराष्ट्राची पूर्वी सुसंस्कृत म्हणून ओळख होती
सत्ताधारी आणि विरोधकात वादंग होत , पण,वैरभावना नव्हती
पण आता मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचे सम्बन्ध प्रतिस्पर्धी नाही तर साता जन्माचे वैरी अशे झाले आहेत !
सत्ताधाऱ्यांनी खरे तर अधिक संयमी असायला हवे , पण ,
इथे मात्र तेच गुंडगिरी आणि दादागिरीवर उतरले आहेत !
विरोधकांचे कोथळे काढायची भाषा करताहेत !
त्यांना घरातून भरल्या ताटावरून उचलून नेत आहेत !
स्थानबद्ध करू पाहताहेत !
घरांवर बुलडोझर चालवताहेत !
आणि हे कमी म्हणून कि काय, आता तर ते प्रत्यक्ष राज्यपालांच्या धोतरावर उतरले आहेत !
न्यायपालिकेने वारंवार झापडल्यानंतरही त्यांना सुबुद्धी येण्याची लक्षणे नाहीत !
जनतेच्या मनात आज डाकूदरोडेखोरांपेक्षाही यांच्या पोलिसांची अधिक धास्ती भरली आहे !
सर्वत्र अराजकसदृश स्थिती दिसताहे !
पण, अशा या भयानक परिस्थितीतही महाराष्ट्राला केवळ आपले प्रिय(!) मामुच वाचवू शकतात !
महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते केव्हाही आपला राजीनामा फेकू शकतात !
कवी -- अनिल शेंडे .